भारतीय जनता पक्षाचे नेते आणिकेंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज पुण्यात माध्यमांशी बोलताना मनसे पक्ष आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली. राज ठाकरे यांचे किती आमदार आणि खासदार आहेत. त्यांनी आमच्याबद्दल बोलू नये. त्यांना आमच्यावर टीका करण्याचा कुठलाही अधिकार नाही, असे म्हणत नारायण राणे यांनी राज ठाकरे यांना दिवचले आहे. यासोबतच राज्यात कायदा आणि सुव्यवस्था चांगली आहे. जे कोणी दंगल करेल त्यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा नारायण राणे यांनी दिला.
मोदी सरकार रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून सरकारी कार्यालय आणि सरकारी 10 लाख नोकरी दिल्या जाणार आहेत. सरकारने आतापर्यंत ३ लाख नोकऱ्या दिल्या आहेत. नको त्या ठिकाणी नको ते विषय नको. ज्या माणसाने अडीच वर्षात एकही नोकरी दिली नाही त्याची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदींशी करु नये, असे म्हणत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
पुढे राऊत यांच्यावर निशाणा साधताना म्हणाले की, १६ आमदारांच्या अपात्रता प्रकरणावरून पोपट हा शब्द चर्चेत आला आहे. त्यावर बोलताना नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत (Sanjay Raut) याला काम धंदा नाही. शिवसेना पोपट मातोश्रीत होता तोवर ठीक होता. आता मुख्यमंत्री झाल्यावर लगेच यांना अस म्हणू नये. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर संजय राऊत आणि उद्धव ठाकरे डिप्रेशनमध्ये गेले आहेत, असे राणे म्हणाले.