मुंबई |
समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी तब्बल ६० कोटींचा निधी शनिवारी मिळाला आहे. त्यामुळे गत काही महिन्यांपासून निधीच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्याना मोठा दिलासा मानला जात आहे. विद्यार्थ्यांच्या हक्काचा निधी लवकरच त्याच्या खात्यात जमा केला जाणार आहे.
राज्यात विभागीय, जिल्हा व तालुका याप्रमाणे विविध स्तरावर विद्यार्थ्यांना ६० हजार ते ४८ हजार वार्षिक त्यांच्या खात्यात जमा केले जातात. यापूर्वी स्वाधार योजनेसाठी १५ कोटींचा निधी मिळाला होता.