भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना काही दिवसांपूर्वी जीवे मारण्याची धमकी फोनवरून आली होती या धमकीमुळे राज्याच्या नाही तर देशाच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती तसेच या प्रकरणात पोलिसांनी कारवाई करत धमकी देणाऱ्या व्यक्ती सुद्धा केली होती मात्र आता पुन्हा एकदा नितीन गडकरी यांना धमकी आल्याची माहिती समोर येत आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात पुन्हा धमकीचा फोन आला आहे. फोन करणाऱ्याने मला केंद्रीय मंत्र्याशी बोलायचे आहे असं सांगत धमकी दिली. नितीन गडकरी यांच्या कार्यालयातून दिल्ली पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. पोलीस याप्रकरणी सर्व बाजूंनी तपास करत आहेत. याआधी दोनदान नितीन गडकरी यांच्या कार्यालयात धमकी फोन आला होता. त्याप्रकरणी एएनआयचा तपास सुरु आहे.
काल संध्याकाळी नितीन गडकरी यांच्या कार्यालयात एक फोन आला. त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी फोन उचलला. त्यावेळी समोरुन बोलणाऱ्या व्यक्तीने आपल्याला केंद्रीय मंत्र्यांशी बोलायचं असल्याचं सांगितलं. यावर कर्मचाऱ्यांनी गडकरी कामात व्यस्त असल्याने ते फोनवर बोलू शकत नसल्याचं सांगतिलं. यावर त्या व्यक्तीने धमकी दिली. हा व्यक्ती कोण आहे, तो कुठल्या ठिकाणाहून बोलत होता, त्याचा उद्देश काय होता याचा तपास आता पोलीस करत आहेत.