Latest Marathi News

BREAKING NEWS

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आवाहनाला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद … अनंत चतुर्दशी दिवशी सुमारे १ लाख ६३ हजार पुणेकरांनी केला मेट्रोने प्रवास

0

पुणे , २९ सप्टेंबर : अनंत चतुर्दशीची मिरवणूक पहायला आणि श्री गजाननाला निरोप द्यायला पुणे आणि परिसरातील लक्षावधी भाविकांची गर्दी होत असते. तसेच पावसाळ्यामुळे वाहतूक कोंडीची शक्यता देखील असते. प्रशासनाने याबाबतची खबरदारी घेतली आहेच, पण संभाव्य गर्दी, वाहतूक कोंडी आणि त्यामुळे होणारा त्रास टाळण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सर्व पुणेकरांना नम्रतापूर्वक आवाहन केले कि, मेट्रोने प्रवास करुया आणि गैरसोय टाळुया. पाटील यांच्या या आवाहनाला पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, अनंत चतुर्दशीची मिरवणूक पहायला आणि श्री गजाननाला निरोप द्यायला पुणे आणि परिसरात भाविकांची तोबा गर्दी असते. तसेच पावसाळ्यामुळे वाहतूक कोंडीची शक्यता देखील असते. यानुषंगाने संभाव्य गर्दी, वाहतूक कोंडी आणि त्यामुळे होणारा त्रास टाळण्यासाठी सर्व पुणेकरांना अनंत चतुर्दशी दिवशी मेट्रोने प्रवास करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला पुणेकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून अनंत चतुर्दशी दिवशी सुमारे १ लाख ६३ हजार पुणेकरांनी मेट्रोने प्रवास केला आहे.

पुणेकरांच्या या प्रतिसादाला मनापासून सलाम! असे पाटील यांनी म्हटले. आगामी काळात सण उत्सवांमध्येही पुणेकरांनी वाहतूककोंडीत न अडकता मेट्रोला प्राधान्य द्यावे असे मी आवाहन करतो असेही ते म्हणाले. चंद्रकांत पाटील यांनी स्वतः लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी गुरुवारी वनाझ ते पुणे महापालिका तसेच पुणे मेट्रो ते बाबूगेनू चौक येथे दुचाकीने प्रवास केला.

Leave A Reply

Your email address will not be published.