बाप्पाच्या निरोपानंतर सर्वच राजकीय पक्षांचे नेते पत्रकार मित्रांसोबत चंद्रकांत पाटील यांनी काका हलवाईंकडे जमून घेतला अल्पोपहाराचा आनंद पुणे , २८ सप्टेंबर : आज अनंत चतुर्दशी! साश्रु नयनांनी पण तितक्याच जल्लोषात संपूर्ण महाराष्ट्र आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! असा एकच जयघोष सर्वत्र सुरू आहे. सांस्कृतिक राजधानी पुण्यातही ढोल ताशाच्या निनादात गणरायाला निरोप दिला जात आहे. या जल्लोषात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सहभाग घेतला. त्यानंतर अल्पोपहाराचा आनंद देखील लुटला.
चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, पुण्यासारखा गणेशोत्सव जगाच्या पाठीवर कुठेही होत नाही. दहा दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर आज सर्वच पुणेकरांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी गर्दी केली आहे. आज पुण्याचा पालकमंत्री म्हणून या मिरवणुकीचा शुभारंभ करण्याचे भाग्य लाभले. थोर स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य टिळक आणि माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन केले. त्यानंतर मानाच्या सर्व गणपतींचे दर्शन घेऊन त्यांना निरोप दिला. या निरोपानंतर पुण्याच्या संस्कृतीचे आणखीन एक दर्शन घडते ते म्हणजे, यानंतर सर्वच राजकीय पक्षांचे नेते पत्रकार मित्र काका हलवाईंकडे जमून अल्पोपहार घेत आपल्या अनुभवांची देवाणघेवाण करतात.
चंद्रकांत पाटील यांनी आजच्या दिवशी या उपक्रमात सहभाग होऊन , सर्वांशी मनसोक्त संवाद साधला. या वातावरणाचा आनंद घेत पाटील म्हणाले कि, हे फक्त पुण्यातच होतं.