Latest Marathi News

BREAKING NEWS

स्वच्छता पंधरवड्यात आपण सर्वजण आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ करण्यासाठी श्रमदान करूया, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे नागरिकांना आवाहन

0

मुंबई , ३० सप्टेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या १०५ व्या भागात त्यांनी लोकांना १ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून एक तास श्रमदान करण्याचे आवाहन केले आहे. गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला बापूंना हीच स्वच्छ श्रद्धांजली ठरणार असल्याचे मोदी यांनी म्हटले. मोदींच्या या मोहिमेत आपण सगळ्यांनी सहभागी होऊयात असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, स्वच्छ भारत हा निरोगी, समृद्ध आणि परिपूर्ण भारताचा आधार आहे! आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व देशवासियांना १ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजल्यापासून स्वच्छता मोहिमेत आपले श्रम दान करण्याचे आवाहन केले आहे. चला तर मग, या निमित्ताने साजरा होणाऱ्या स्वच्छता पंधरवड्यात आपण सर्वजण आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ करण्यासाठी श्रमदान करूया, असे पाटील यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान मोदींनी लोकांना वेळ काढून या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले. ते म्हणाले कि, त्यांनी लोकांना त्यांच्या गल्लीत, शेजारच्या, कोणतेही उदयान , नदी, तलाव किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहिमेत सहभागी व्हा असे म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.