एकीकडॆ राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर वर्षपूर्तीनंतर राष्ट्रवादीचे नेते अजित यावर हे सुद्धा शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाले मात्र अजित पवारांच्या सत्तेत येण्याने शिंदे गटासह भारतीय जनता पक्षाचे अनेक बडे नेते नाराज असल्याचे समोर आले होते या सर्व नाराजांची वरिष्ठ पातळीवर समजूत काढण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरु आहे,
अशातच आता सोलापुरातून एक मोठी बातमी समोर येत असून भाजपाला ओठ धक्का बसला आहे. सोलापूरमध्ये भाजपला मोठं खिंडार पडलं आहे. भाजपचे ४ माजी नगरसेवकांनी भाजपला सोडचिट्टी दिली आहे. हे चारही नगरसेवक तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर यांच्या भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार भारतीय जनता पक्षाचे दिवंगत नेते ,माजी खासदार लिंगराज वल्याळ यांचे पुत्र,माजी नगरसेवक नागेश वल्याळ तसेच संतोष भोसले,राजश्री चव्हाण आणि जुगनबाई आंबेवाले यांनी भाजपचे शहराध्यक्ष विक्रम देशमुख आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे राजीनामे पाठविले आहेत.
विशेष बाब म्हणजे काही दिवसांपूर्वी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आल्यानंतर त्यांनी आवर्जून नागेश वल्याळ यांच्या घरी जाऊन भेट दिली होती. त्यावेळेसच नागेश वल्याळ यांच्या बीआरएस मध्ये प्रवेश करण्याच्या चर्चेला उधाण आलं होतं.