मुंबई |
विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासक्रमाच्या प्रवेशाला अडचणी येऊ नयेत म्हणून सर्व अकृषी विद्यापीठांनी परीक्षेचे निकाल वेळेत जाहीर करावेत अशी सूचना उच्च व चंद्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिली आहे.
यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर , उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अजित बाविस्कर, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष आयुक्त महेंद्र वारभुवन, राज्यातील सर्व अकृषि विद्यापीठाचे अधिकारी व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
पदवी परीक्षेचे निकाल वेळेवर जाहीर होणे गरजेचे आहे, विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून त्यांचा वेळ वाया जाऊ नयेत म्हणून सर्व अकृषी विद्यापीठांनी विद्यार्थी हितासाठी वेळेत निकाल जाहीर होतील ,याचे नियोजन करून शैक्षणिक वर्ष वेळेत सुरू ठेवावे अशा सूचनाही या बैठकीत चंद्रकांत दादांनी दिले आहेत.