गेल्या अनेक दिवसापासून सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी दोघे एकमेकांना डेट करत आहेत. या दोघांची जोडी प्रचंड पसंत केली जाते. हे सेलिब्रेटी कपल कधी लग्न करणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे. दरम्यान आता अथिया शेट्टी आणि केएल राहुलनंतर हे दोघेही लग्न बंधनात अडकण्याची तयारी करत असल्याचं म्हटलं जात आहे. कियारा आणि सिद्धार्थबाबत एक नवा रिपोर्ट समोर आला आहे.
अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राची जोडी प्रचंड पसंत केली जाते. ‘शेरशाह’ चित्रपटाच्या सेटवर दोघे एकमेकांच्या जवळ आले होते. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. त्यांची जोडीसुद्धा प्रचंड लोकप्रिय झाली होती. या चित्रपटानंतर कियारा आणि सिद्धार्थ एकमेकांना डेट करु लागले होते. या दोघांनी सुरुवातीला आपलं नातं लपवलं होतं. मात्र आता हे दोघेही एकत्र सोबत फिरताना आणि व्हेकेशन एन्जॉय करताना दिसून येतात.गेल्यावर्षीपासून कियारा आणि सिद्धार्थ यांच्या लग्नाच्या चर्चा सुरु आहेत.
परंतु असं झालं नाही. मात्र या नव्या वर्षात अनेक सेलिब्रेटी कपल्स लग्नगाठ बांधणार असल्याचा अंदाज आहे. यामध्ये अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुलने लग्नगाठ बांधत बी टाऊनमध्ये लग्नसराईला सुरुवात केली आहे. (हे वाचा: दरम्यान आता कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरला आहे.हे जोडपं लवकरच लग्नाच्याबेडीत अडकू शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे. इतकंच नव्हे तर या दोघांनी आपल्या लग्नाची तयारीदेखील सुरु केल्याचं म्हटलं जात आहे.