Latest Marathi News

BREAKING NEWS

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळाचे कौतुक

0

पुणे: पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक लवकर पूर्ण होण्यासाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळाकडून घोषित करण्यात आल्याप्रमाणे ४ वाजता मिरवणुकीत सहभाग घेतला. याबद्दल आज पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ट्रस्टच्या सर्व विश्वस्त व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करुन प्रशासनाला सहकार्य केल्याबद्दल कौतुक केले.

श्रीमंत दगडूशेठ गणपती मंडळाचा पुढाकार भविष्यात पुण्याची गणेश विसर्जन मिरवणुकीला दिशा देणारा ठरेल, असा विश्वास यावेळी पाटील यांनी व्यक्त केला.

चंद्रकांतदादांच्या वतीने ट्रस्टच्या सर्व विश्वस्तांचा सन्मान देखील करण्यात आला, याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष माणिकदादा चव्हाण, उपाध्यक्ष डॉ. रामचंद्र परांजपे, सुनील रासने, विश्वस्त हेमंत रासने, कोषाध्यक्ष महेश सुर्यवंशी, चिटणीस अमोल केदारी यांच्यासह सुवर्णयुग तरुण मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.