पुणे महानगर परिवहन महामंडळाने सुरू केलेल्या कॅशलेस तिकीट सुविधेचा शुभारंभ पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शुभारंभ
पुणे: कॅशलेस मेट्रोच्या तिकीट सुविधेनंतर आता पुणेकरांना पीएमपीएलच्या देखील कॅशलेस तिकीट सेवेचा लाभ घेता येणार आहे. देशाचे पंतप्रधान माननीय श्री. नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडियाला साथ देण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने सुरू केलेल्या कॅशलेस तिकीट सुविधेचा शुभारंभ आज पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते तसेच पीएमपीएमएलच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला.
सध्याच्या घडीला कॅशलेस सुविधा सहज आणि सोपी असल्याचे सांगत म्हणून देशभरात सर्वत्र कॅशलेसचा वापर होतो. त्यामुळे आगामी काळात पीएमपीएमएल आणि मेट्रो यांचेही एकच तिकीट उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही यावेळी पाटील दिली.