शिवसेनेचे 14 खासदार करणार बंडखोरी ? वेगळा गट म्हणून मान्यता देण्यासाठी लोकसभा अध्यक्षांकडे मागणी करणार?
मुंबई | आमदारांपाठोपाठ शिवसेनेतील खासदारही एकनाथ शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा राजकारणात होत आहे. तर पुढील आठवड्यात होणाऱ्या राष्ट्रपतीपदासाठी निवडणुक होत आहे. या पार्श्वभूमीवर निर्णय घेण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पक्षाच्या खासदारांची बैठक बोलावली आहे. त्यामळे या बैठकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 40 आमदारांनी बंड केल्यानंतर आता शिवसेनेचे 18 पैकी 14 खासदारही बंडाच्या तयारीत असल्याचं समजतं. द हिंदू वृत्तपत्रानं दिलेल्या बातमीनुसार भाजपबरोबर सत्ता स्थापन करावी यासाठी शिवसेनेचे 14 खासदार बंडाच्या तयारीत आहेत. त्यासाठी 13 किंवा 14 जुलै रोजी हे खासदार वेगळा गट म्हणून मान्यता द्यावी यासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे मागणी करणार आहेत.
दरम्यान, शिवसेनेच्या काही खासदारांनी राष्ट्रपती निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची मागणी केलीय. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज खासदारांची बैठक बोलावली असून त्यात द्रौपदी मूर्मू यांना पाठिंबा घोषित करण्याची शक्यता आहे. समोर आलेल्या माहितीनुसार आमदारांपाठोपाठ शिवसेनेतील खासदारही एकनाथ शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा राजकारणात होत आहे.
या पार्श्वभूमीवर उद्या सोमवारी उद्धव ठाकरे यांनी शिवसेना खासदारांची बैठक बोलावली आहे. शिवसेनेतील 15 खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू आहे. या संदर्भाने माध्यमांनी लोखंडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ठोस काही सांगितले नाही. तथापि, अनेक खासदार भाजपसोबत जाण्याची मागणी करत होते.