Latest Marathi News

BREAKING NEWS

आईच्या दुधाशी बेईमानी करू नका.”, उद्धव ठाकरेंचे निष्ठावंत आमदारांना पत्र

0

 

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटात शामिल होऊन ४० आमदारांनी बंड करत शिवसेनेला मोठा धक्का दिला. या फुटीमध्येही १५ आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर निष्ठा कायम राखली आहे. या निष्ठावंत आमदारांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भावूक पत्र पाठवून त्यांचे कौतुक केले आहे. सध्या आमदारांना लिहिलेल्या या पात्राची जोरदार चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात होत आहे.

उद्धव ठाकरेंनी पत्रात म्हणता आहे की, जय महाराष्ट्र! शिवसेना हा आपला परिवार आहे. आजही वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आपले सर्वस्व आहे. निष्ठा आणि अस्मितेची महती शिवसेनाप्रमुखांनीच आपल्याला शिकवली. आईच्या दुधाशी बेईमानी करू नका, हा त्यांचा निष्ठेबाबतचा मंत्र आजही सगळ्यांना सन्माननीय आहे.

शिवसेनेचे आमदार म्हणून आपण त्या निष्ठेचे पालन केलेत व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे पाईक असल्याचे दाखवून दिलेत. कोणत्याही धमक्या, प्रलोभनांना बळी न पडता आपण शिवसेनेसोबत राहिलात आपल्या भूमिकेमुळे महाराष्ट्राला अभिमान वाटला आणि शिवसेनेला बळ मिळाले. आई जगदंबा आपणास उदंड आयुष्य देवो, असे पत्रात म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.