इंडिया टूडे –सी वोटर ‘मूड ऑफ द नेशन’ या सर्वेक्षणात शभरात सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री कोण? याचीही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.या यादीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपेक्षा विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पिछाडीवर असल्याने निदर्शनास आले. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर निशाणा साधला. तर पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरे यांना स्थान मिळाल्याने त्यांचे कौतुक करण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडलं आहे. उद्धव ठाकरेंच्या तुलनेत शिंदे कमी लोकप्रिय असल्याचा टोला तपासे यांनी लगावला. ज अनेक मुद्दे महाराष्ट्रात असताना हे मुद्दे हाताळण्यामध्ये शिंदे – फडणवीस सरकार अपयशी ठरले आहे. सर्वोच्च न्यायालयात सरकारच्या वैधतेचा निकाल जेव्हा लागेल, त्यावेळी इंडिया टुडेच्या सर्व्हेतून आलेला ३४ खासदारांचा आकडा ४० च्या आसपास जाईल, असेही ते म्हणले.
तसेच सर्व्हेक्षणात एकनाथ शिंदे यांना फक्त दोन टक्के लोकांनी पसंती दिली. याचा अर्थ राज्यातील जनतेचा कौल कोणत्या दिशेने आहे, हे शिंदे समर्थकांनी लक्षात घ्यावे, अशा शब्दात तपासे शिंदे गटाला खडेबोल सुनावले. भारतातील सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून योगी आदित्यनाथ यांचे नाव पुढे आले आहे. त्यांना ३९ टक्के लोकांनी पसंती दिली आहे. तर दुसऱ्या क्रमाकांवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल असून त्यांना १६ टक्के लोकांनी पसंती दिली आहे.
तिसऱ्या क्रमांकावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी असून त्यांना सात टक्के लोकांनी पसंती दिली. त्याचप्रमाणे चौथ्या क्रमांकावर तामिळनाडूचे मुख्यंमत्री एम. के. स्टॅलिन, पाचव्या क्रमांकावर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक आहेत, तर सहाव्या क्रमांकावर आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिसवा सरम, सातव्या क्रमाकांवर शिवराज सिंह चौहान आहेत,