Latest Marathi News

BREAKING NEWS

प्राचार्याला मारहाण करणं आमदार बांगर यांना भोवलं, बांगर विरोधात तक्रार दाखल

0

प्राचार्याला मारहाण करणं शिंदे गटाचे कळवणुचे आमदार संतोष बांगर यांच्या अंगलट आले आहे. प्राचार्याला मारहाण केल्याप्रकरणी आमदार बांगर यांच्यावर हिंगोली ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचबरोबर महाविद्यालयातील पाच अधिकाऱ्यांसह इतर 30 ते 40 जणांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाण झाल्यानंतर तब्बल 10 दिवसानंतर आमदार बांगर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी प्राचार्याला मारहाण केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी अखेर 10 दिवसानंतर आमदार बांगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राचार्याला मारहाण करणं बांगर यांना चांगलच भोवलं आहे. त्या ठिकाणी आमदार बांगर यांनी सीसीटीव्ही यंत्रणेची सुद्धा तोडफोड केली होती. त्यामध्ये पाच हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे.

कायमच कोणत्या-कोणत्या वादामुळे चर्चेत असणारे कळमनुरीचे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी केलेल्या मारहाणीचा पुन्हा एक व्हिडीओ समोर आला आहे. हिंगोली शहरालगत असलेल्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्राचार्य अशोक उपाध्याय यांना आमदार बांगर शिवीगाळ करत मारहाण केली होती. आमदार संतोष बांगरच नाही तर बांगर यांचे कार्यकर्ते सुद्धा प्राचार्यांचे कान पकडत मारहाण करत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसून येत होते.

या प्रकरणावर बांगर म्हणाले की, या सर्व प्रकरणावर खुद्द आमदार बांगर यांनी खुलासा केला होता. मारहाण करण्यात आलेल्या प्राचार्याने एका महिलेवरती अन्याय केला होता. त्यामुळं माहिलेवर अत्याच्यार होताना छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात संतोष बांगर सहन करणार नाही. यासाठी माझ्यावर गुन्हा दाखल झाला तरी त्याची पर्वा नसल्याचं संतोष बांगर यांनी म्हटलं होतं.

Leave A Reply

Your email address will not be published.