Latest Marathi News

BREAKING NEWS

महाराष्ट्रासह अनेक राज्यांत नवे राज्यपाल? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली मंत्रिमंडळ बैठक

0

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ७५ सदस्यीय मंत्रिमंडळाची बैठक ३१ जानेवारीच्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी या आठवड्याच्या अखेरीस बोलावली आहे. या मोठ्या फेरबदलापूर्वी ही विद्यमान मंत्रिमंडळाची अखेरची बैठक असू शकते, अशी साऊथ ब्लॉकमध्ये चर्चा आहे. अनेक राज्यांत नवीन राज्यपाल व उपराज्यपालांच्या नियुक्त्या व भाजपमधील बदल एकाचवेळी होऊ शकतात, असे समजते.

सूत्रांनी सांगितले की, टीम-मोदीमध्ये २०२४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठा फेरबदल होऊ घातला असून, त्याबाबत सहकारी मंत्र्यांना खडे बोल सुनावण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली आहे. मोदी आपल्या वॉर-टीमला अंतिम स्वरूप देत असून, कमी कार्यक्षम मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखविला जाऊ शकतो.मंत्रिमंडळाच्या या बैठकीच्या अजेंड्याबाबत कोणालाही माहिती देण्यात आलेली नाही. तथापि, तुमच्या कार्यक्षमतेवर बारीक नजर ठेवली जात आहे, असे मोदींनी मंत्र्यांना काही महिन्यांपूर्वी सांगितले होते.

या बैठकीत त्यांची झाडाझडती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंत्र्यांमध्ये सध्या अस्वस्थता आहे. भाजपने एक सर्वेक्षण केलेले असून, त्यात पक्ष कमजोर असलेल्या लोकसभेच्या जागांची संख्या १४४ वरून १७० गेल्याचे पुढे आले आहे. महाराष्ट्र, बिहार, मध्य प्रदेश, पंजाब, छत्तीसगढ व आणखी काही महत्त्वाच्या राज्यांतील ही स्थिती आहे. छत्तीसगढचे माजी मुख्यमंत्री सध्या भाजपचे उपाध्यक्ष असून, त्यांना प्रजासत्ताक दिनी पक्ष मुख्यालयात तिरंगा फडकावण्यासाठी नियुक्त करण्यात आले होते. यावरून सर्व काही स्पष्ट होते.

Leave A Reply

Your email address will not be published.