Latest Marathi News

BREAKING NEWS

शिंदे २०२४ ला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा नाहीत?

0

मुंबई |

राज्यात एकीकडे सत्ताधारी शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरून तर्क-वितर्क लढवले जात आहेत. विरोधकांकडून सरकार अल्पकाळ टिकेल असे दावे केले जात आहेत. तर दुसरीकडे पुढील वर्षी राज्यात होणाऱ्या विधानसभा आणि देशात होणाऱ्या लोकसभा निवडणुकांचे वेध सर्वपक्षीयांना लागले आहेत. सर्वच पक्षांनी त्या दिशेनं नियोजन करायला सुरुवात केली आहे. आघाडी-युतीची चर्चा सुरू झालेली असताना मुख्यमंत्रीपदाच्या चेहेऱ्यांचीही चर्चा पाहायला मिळत आहे. यात भाजपा-शिंदे गट युतीच्या मुख्यमंत्रीपदावरून अनेक तर्क लावले जात आहेत.

एकीकडे भारतीय जनता पक्षानं पुढील वर्षीच्या विधानसभा निवडणुका एकनाथ शिंदेंच्याच नेतृत्वाखाली लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे तर्कानुसार एकनाथ शिंदेच युतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असणं अपेक्षित आहे. मात्र, त्यासंदर्भात अद्याप युतीमध्ये स्पष्ट भूमिका ठरली नसल्याचंच चित्र देवेंद्र फडणवीसांनी नुकत्याच केलेल्या विधानामुळे निर्माण झालं आहे.

याआधी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वगुणांविषयी ठाम भूमिका मांडणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी यावेळी बोलताना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवण्याबाबत पक्षातील वरीष्ठ निर्णय घेतील, अशी भूमिका मांडली. कोणत्याही पक्षाला आणि कार्यकर्त्याला हेच वाटत असतं की आमचा नेता मुख्यमंत्री व्हावा. पण २०२४ ची निवडणूक एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाच आम्ही लढवू. जो मुख्यमंत्री असतो, तोच सरकारचा नेता असतो, त्याच्याच नेतृत्वात निवडणुका लढवल्या जातात”, असं फडणवीस यावेळी म्हणाले.

कोण मुख्यमंत्री असेल, हे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना विचारायला हवं. भाजपामध्ये सगळे निर्णय संसदीय समिती घेते. यासंदर्भात काही बोलण्याचाही अधिकार मला नाहीये”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.