येत्या १ जुलैला मुंबई महापालिकेवर मोर्चा काढण्याची तयारी ठाकरे गटाचे आमदार आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे करत आहेत. तर त्याचदिवशी त्यांना शिंदे गटाच्या शिवसेनेकडून जोर का झटका दिला जाणार आहे. आदित्य ठाकरेंचे खास मित्र आणि युवा सेना कार्यकारिणी सदस्य १ जुलैला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय राहुल कनाल शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.
राहूल कनाल यांनी महिन्यापूर्वी युवासेना कार्यकारिणीचा व्हॉट्सअॅप ग्रूप सोडला होता. शिवसेनेत येण्यापूर्वी ते काँग्रेसमध्ये कार्यरत होते. राहूल कनाल युवासेनेत नाराज असल्याची चर्चा आहे. राहुल कनाल हे आदित्य ठाकरेंचे अत्यंत जवळचे मित्र समजले जातात. राहुल कनाल कोअर कमिटीच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमधून लेफ्ट झाले आहेत. अंतर्गत कुरघोडींना कंटाळून राहुल कनाल बाहेर पडल्याची चर्चा आहे.
महाविकास आघाडीची सत्ता सत्ता असताना शिर्डी संस्थानवर राहुल कनाल यांची विश्वस्त म्हणून वर्णी लागली होती. युवा सेनेतल्या अमेय घोले, सिद्धेश कदम, समाधान सरवणकर यांनीही नाराजी व्यक्त करत युवा सेना सोडली होती. राहुल कनाल हे वांद्रे पश्चिममधून विधानसभेसाठी तयारी करत होते. तर अमेय घोले यांनी सचिव सुरज चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप करत शिवसेना सोडली होती