Latest Marathi News

BREAKING NEWS

महाराष्ट्रातून किती मुली बेपत्ता? आकडेवारी देत शरद पवारांचा फडणवीसांवर निशाणा

0

मुंबई | पहाटेच्या शपथविधीविषयी देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा भाष्य केल्यांनंतर नव्या चर्चाना उधाण आले आहे. रिपब्लिकन भारत या वृत्तवाहिनीला भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखत दिली. त्यात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. शरद पवार यांच्या आशीर्वादानेच पहाटेचा शपथविधी झाला होता, असा दावा फडणवीस यांनी केला.

तसेच भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार यावे म्हणून शरद पवार यांनीच पुढाकार घेतला होता, असे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. फडणवीस यांच्या या मुलाखतीनंतर शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. राज्यातील कायदा अन् सुव्यवस्थेची परिस्थिती कशी आहे? किती मुली बेपत्ता झाल्या आहेत? याची आकडेवारी शरद पवार यांनी सादर करत देवेंद्र फडणवीस यांच्यांवर निशाणा साधला.

राज्यात शिवसेना-भाजपचे नवीन सरकारला येऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. या वर्षभरात राज्यात कायदा अन् सुव्यवस्थाची परिस्थिती गंभीर झाली आहे. जानेवारी २०२३ ते २३ मे २०२३ पर्यंत पुणे शहरातून ९३७ मुली बेपत्ता झाल्या आहेत. ठाण्यातून ७२१, मुंबईतून ७३८ मुली बेपत्ता आहेत. तसेच सोलापूरातून ६२ मुली बेपत्ता आहेत. सर्व मिळून २ हजार ६५८ मुली बेपत्ता आहेत.

राज्यातील १४ जिल्ह्यातील हा आकडा ४ हजारांपेक्षा जास्त आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. राज्यात दीडवर्षात ६ हजार ८८९ मुली बेपत्ता झाल्या आहेत. राज्यातील गृहमंत्र्यांनी बाकीचे वक्तव्य करण्याऐवजी या महिलांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या कुटुंबियांची हवाली करायला हवे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुणे येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.