Latest Marathi News

BREAKING NEWS

शिंदे गटातील १० आमदार नाराज; सर्व जण ठाकरे गटात जाण्यास इच्छुक

0

मुंबई । एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून भाजपा बरोबर सरकार स्थापन केले मात्र अनेक आमदारांना मंत्रिपद अद्यापही न मिळाल्यामुळे नाराज समोर आले होते त्यातच अजित पवार शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यामुळे शिंदे गटासह भाजपचे अनेक आमदार नाराज असल्याचे वृत्त समोर आले होते ज्या राष्ट्र्वादीमुळे शिवसेन्ट फूट पडली तीच राष्ट्रवादी पुन्हा सत्तेत आल्यामुळे शिंदे गटाच्या आमदारांनीं उघड उघड नाराजी मुख्यमंत्र्यांकडे बोलून दाखवली होती.

अशातच आता राज्य सरकारमध्ये सहभागी शिवसेनेतील (शिंदे गट) दहा व इतर पाच असे पंधरा आमदार नाराज आहेत. हे सर्व जण ठाकरेंकडे जाण्यास इच्छुक आहेत. मात्र, त्यांना पुन्हा पक्षात घ्यायचे की नाही, हा निर्णय तेच घेतील, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत केले.

आमदार पवार म्हणाले, शिवसेनेत (शिंदे गट) सर्व काही आलबेल नाही. जवळपास दहा आमदार नाराज आहेत, अशी माझ्याकडे माहिती आहे. त्यांचे दहा व इतर पाच असे पंधरा आमदार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जाण्यास उत्सुक आहेत रोहित पवार यांनी केले होते या विधानावर आता ठाकरे गटाचे आमदार काय प्रतिक्रिया देतायत हे पाहावे लागणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.