स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव आनंदाने, उत्साहाने साजरा करुन स्वातंत्र्य योद्ध्यांना स्मरण करावे – चंद्रकांत पाटील
पुणे : भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सोहळ्याची सांगता सोहळा पुन्हा एकदा देश भरात हर घर तिरंगा अभियान राबवून मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक नागरिकांनी आज पासूनच आपल्या घरावर तिरंगा झेंडा फडकावत या सोहळ्यात सहभाग घेतला आहे.
पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील आपल्या पुण्यातील निवास्थानी राष्ट्रध्वज उभारून त्यास मानवंदना दिली.
याबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो शेअर करत ते म्हणाले कि स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचा सांगता सोहळा देशभरात उत्साहात सुरु झाला आहे. गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही ‘हर घर तिरंगा’अंतर्गत प्रत्येक भारतीयांनी आपल्या घरी राष्ट्रध्वज उभारुन मानवंदना द्यायची आहे. माझ्या कोथरुडमधील निवासस्थानी राष्ट्रध्वज उभारुन मानवंदना दिली. त्यासोबतच त्यांनी सर्वांना आवाहन आहे की, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात प्रत्येकांनी सहभागी व्हावे, आणि आपला हा उत्सव आनंदाने, उत्साहाने साजरा करुन स्वातंत्र्य योद्ध्यांना स्मरण करावे.