Latest Marathi News

BREAKING NEWS

शिंदे गटाच्या आमदाराची तब्बल साडेसात कोटींची फसवणूक

0

मुंबई | एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांच्या समर्थनात पाठिंबा देणारे आमदार प्रताप सरनाईक यांच्या संदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील आमदार प्रताप सरनाईक यांची तब्बल ७ कोटी ६६ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान जमीन व्यवहारात फसवणूक करण्यात आल्याच्या प्रकरणात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

शिंदे गटातील आमदार प्रताप सरनाईक यांना घोडबंदर येथील एका जमीनीच्या व्यवहारात ही फसवणूक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी जमीन खरेदी करण्यासाठी त्यांनी एका व्यक्तील संपर्क केला होता. मार्टीन बर्नार्डो, कोरिया असं या व्यक्तीचं नाव आहे. दरम्यान प्रताप सरनाईक यांनी जमीनीच्या व्यवहारासाठी पहिल्या टप्प्यात साडेतीन कोटी रूपये दिले.मात्र त्या व्यक्तीन जमीन नावावर केली नाहीच, सोबतच पैसे देखील परत केले नाहीत अशी माहिती मिळत आहे.

शिंदे गटातील आमदार प्रताप सरनाईक यांना घोडबंदर येथील एका जमीनीच्या व्यवहारात ही फसवणूक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी जमीन खरेदी करण्यासाठी त्यांनी एका व्यक्तील संपर्क केला होता. मार्टीन बर्नार्डो, कोरिया असं या व्यक्तीचं नाव आहे. दरम्यान प्रताप सरनाईक यांनी जमीनीच्या व्यवहारासाठी पहिल्या टप्प्यात साडेतीन कोटी रूपये दिले.मात्र त्या व्यक्तीन जमीन नावावर केली नाहीच, सोबतच पैसे देखील परत केले नाहीत अशी माहिती मिळत आहे. टीव्ही९ या वृत्तवाहिनीने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.