Latest Marathi News

BREAKING NEWS

“अजितदादा मुख्यमंत्री झाल्यास मला आनंद होईल, पण.”;

0

मुंबई | अजितदादा पवार आज ना उद्या मुख्यमंत्री होतीलच, असं मोठं विधान राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केलं. प्रफुल्ल पटेल यांच्या या विधानानंतर राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांचे पुतणे आणि शरद पवार यांच्या गटाचे आमदार रोहित पवार यांनीही मोठं विधान केलं असून या विधानाची आता जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

ते म्हणाले की, “मी अजितदादांचा पुतण्या आहे. त्यामुळे अजितदादा जर राज्याचे मुख्यमंत्री झाले तर मला आनंदच होईल, परंतु सामान्य नागरिक म्हणून मला ही गोष्ट पटणार नाही. जर अजितदादा महाविकास आघाडीमध्ये असते तर पुढचे पाच वर्ष तेच मुख्यमंत्री असते. परंतु सध्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये भांडण लावून दुसरे उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवण्याचा हा प्रयत्न नाही ना?” असे विधान केले.

काय म्हणाले होते प्रफुल पटेल ?

अजित पवार हे लोकप्रिय आणि प्रभावी नेते आहेत. अनेक वर्षांपासून ते आमच्या पक्षाचे नेतृत्व करत आहेत. जे काम करतात, त्यांना आज, उद्या किंवा परवा नक्कीच संधी मिळते. अनेकांना संधी मिळाली आहे. अजितदादांनाही मिळेल, आज नाही तर उद्या किंवा भविष्यात. त्या दिशेने आम्ही काम करू असे सूचक विधान पटेल यांनी केले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.