Latest Marathi News

BREAKING NEWS

मी या तारखेला मुंबई येतोय अमित जानी यांचं मनसे आवाहन

0

मुंबई । पाकिस्तानातून भारतात आपल्या प्रियकराबरोबर अनधिकृतपणे पळून आलेली सीमा हैदरवर हेरगिरीचा आरोप झाला. आता ती तिच्यावर बनणाऱ्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. यूपीचे अमित जानी सीमा हैदरवरचित्रपट बनवत आहेत. आता महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेने धमकी दिलीय. “पाकिस्तानी नागरिकाला भारतीय चित्रपटसृष्टीत कोणतंही स्थान असता कामा नये, या आमच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत.

सीमा हैदर ही पाकिस्तानी महिला सध्या भारतात आहे. ती ISI एजंट आहे अशा बातम्याही पसरल्या होत्या. आमच्या इंडस्ट्रीमधील काही उपटसुंभ प्रसिद्धीसाठी त्याच सीमा हैदरला अभिनेत्री बनवत आहे. देशद्रोही निर्मात्यांना लाजा कशा वाटत नाहीत?” “हे असले तमाशे ताबडतोब बंद करा, नाहीतर मनसेच्या धडक कारवाईसाठी तयार रहा, असा जाहीर इशारा देतोय. ऐकल नाही तर राडा तर होणारच..!!” असा इशारा मनसेच्या चित्रपट शाखेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिला आहे.

आता अमित जानी यांनी मनसेवर आवाहन दिले आहे. त्यांनी मनसेच्या धमकीला उत्तर दिलय. “चित्रपट निर्मात्यांना धमकावणं, त्यांच्याकडून वसुली करणं हे मनसेच काम आहे. मी मनसेच्या हल्ल्याच्या धमकीला अजिबात घाबरत नाही. अमित जानी 19 तारखेला मुंबईत येणार. तुम्ही अमित जानीला रोखू शकत नाही” असं प्रत्युत्तर ‘कराची टू नोएडा’ चित्रपटाचे निर्माते अमित जानी यांनी दिला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात अमित जानी आणि मनसे यांच्यातील वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वेंवर व्यवसायिकाचा गंभीर आरोप

…. तर विधानसभा निवडणूक होणार नाहीत; पृथ्वीराज चव्हाण यांचे मोठं विधान

Leave A Reply

Your email address will not be published.