पैठण |
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत संतपीठ (पैठण) चा पहिला प्रमाणपत्र वितरण सोहळा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत आज संपन्न झाला. विविध संतांनी सांगितलेलं तत्वज्ञान आणि वाङ्मयाच्या अभ्यासासाठी पैठणचं संतपीठ हे आदर्शवत आहे. राज्यभरात संतसाहित्याच्या अध्ययनासाठी विद्यापीठ स्थापण्याची ग्वाही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दिली.

योग, गीता-तत्त्वज्ञान, विपश्यना तसंच संतसाहित्य यांचं शिक्षण घ्यायला जगभरातले विद्यार्थी भारतात येत असतात. त्यांना याचं योग्य प्रशिक्षण मिळावं यासाठी स्वतंत्र विद्यापीठ आणि अभ्यासक्रम तयार करता येऊ शकतो आणि त्याला अनुसरून योग्य व्यवस्था असणं गरजेचं आहे. त्यासाठी आवश्यक तो निधी दिला जाईल, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, या विद्यापीठामध्ये सर्टिफिकेट कोर्स असेल, डिप्लोमा कोर्स असेल, डिग्री कोर्स असेल, पीएचडी असेल जगातल्या सगळ्यांना सुखाची आस लागली आहे. कोणी राम देव बाबांशी जोडले जात आहे तर कोणी श्री श्री रविशंकर महाराजांसोबत जोडले जात आहे, कोणी स्वामीनारायण पंथाशी जोडले जात आहे. आपल्यापेक्षा जास्त जगामध्ये अभ्यास सुरु आहे कि हे काय तत्वज्ञान आहे. त्यामुळे श्री श्री रविशंकर गेले कि त्यांच्या कार्यक्रमाला ५० – ५० हजार विदेशी लोक असतात.
मोठ्या प्रमाणात भारतामध्ये विदेशी लोक जर शिकायला येणार असतील तर ते शिकायला येणार योगा, मेडिटेशन, विपश्यना, भगवतगीता ,तो शिकायला येणार संतांचं साहित्य. विदेशी विद्यार्थी येथे येणार असतील तर आपल्याकडे तशी सोय पाहिजे. अशा चांगल्या कामासाठी आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेलो तर निधीला काहीच कमी पडणार नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
या कार्यक्रमास मंत्रिमंडळातील माझे सहकारी संदीपान भुमरेजी, उच्च-तंत्रशिक्षण विभागाचे सचिव विकासचंद्र रस्तोगी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्यासह संतपीठाचे सर्व अधिकारी आणि वारकरी बांधवही उपस्थित होते.