Latest Marathi News

BREAKING NEWS

शिंदे सरकारचा एकनाथ खडसेंना झटका; भोसरी जमीन व्यवहार प्रकरणाचा तपास सीबीआयकडे

0

 

मुंबई | शिंदे सरकारने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंना मोठा झटका दिला आहे. आता भोसरी एमआयडीसी भुखंड घोट्याळाचा तपास पुन्हा लाचलुचपत विभागामार्फत होणार असल्याचे दिसत आहे. महाविकास आघाडी सरकार असताना खडसे यांना या भुंखड घोटाळ्याप्रकरणी क्लिनचिट मिळाली होती.

लाचलुचपत विभागाने घोट्याळाच्या चौकशीची पुन्हा मागणी करत न्यायालयाकडे चौकशी करण्यासाठी मागतली परवानगी आहे. आता या घोटाळ्याची चौकशी पुन्हा एसीबीकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकनाथ खडसेंना हा मोठा धक्का मानला जात आहे. एकनाथ खडसे यापूर्वी भाजपमध्ये असताना त्यांच्यावर या घोटाळ्याचे आरोप झाले होते. त्यामुळे त्यावेळी खडसे यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. सत्तासंघर्षात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खडसेंना पद्धतशीर बाजूला सारले अशी चर्चाही त्यावेळी राजकीय वर्तुळात होती.

खडसेंनी भाजपमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना खडसेंना या प्रकरणात क्लिनचिट मिळाली होती. आता पुन्हा भोसरी एमआयडीसी भुखंड घोट्याळाचा तपास सुरू होत होण्याची चिन्हे दिसत असल्याने राज्यातील राजकारण वेगळे वळण घेत असल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात.

Leave A Reply

Your email address will not be published.