खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना जेवणाचं आमंत्रण दिलं आहे. “चंद्रकांतदादा लवकर घरी जेवायला या, खास बेत करते”, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी चंद्रकांत पाटलांना खास आमंत्रण दिलं आहे. बस बाई बस’ या झी मराठीवरच्या कार्यक्रमात त्यांना चंद्रकांत पाटलांच्या एका विधानाविषयी कार्यक्रमाचा सूत्रसंचालक सुबोध भावेने प्रश्न विचारला तेव्हा सुप्रिया सुळे यांनी चंद्रकांतदादांना जेवणासाठी आमंत्रित केलं.
पुण्यात एका ठिकाणी बोलताना सुप्रिया सुळेंनी राजकारणापेक्षा घरात लक्ष द्यावं, असं म्हटलं होतं. त्याला सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिलं आहे. “मला घरातील काम किंवा स्वयंपाक करायला कधीही कमीपणा वाटत नाही, उलट मला जेवण बनवून खावू घालायला आवडतं. त्यामुळे चंद्रकांत पाटलांचं ते विधान मी फार मनावर घेत नाही”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
“चंद्रकांतदादा लवकर घरी जेवायला या, खास बेत करते”, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी चंद्रकांत पाटलांना खास आमंत्रण दिलं आहे. बस बाई बस या झी मराठीवरच्या कार्यक्रमात त्यांना चंद्रकांत पाटलांच्या एका विधानाविषयी कार्यक्रमाचा सूत्रसंचालक सुबोध भावेने प्रश्न विचारला तेव्हा सुप्रिया सुळे यांनी चंद्रकांतदादांना जेवणासाठी आमंत्रित केलं.