भाजप आणि शिंदे गटाने सत्ता स्थापन केली. यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सत्तेत आलेल्या नेत्यांवर टीका करण्यास सुरूवात केली आहे.दरम्यान गणपतीच्या आगमणावेळी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी माध्यमांशी चर्चा केली. शिंदे सरकारला अतिृष्टीमुळे हवालदील झालेल्या शेतकऱ्याला मदत देण्याची बुध्दी द्यावी अशी प्रार्थना विघ्हर्त्याकडे केली आहे. त्यांनी शिंदे सरकारच्या कामकाजावर बोट ठेवत मोजक्या शब्दात टीका केली.
ते पुढे म्हणाले कि, शिंदे सरकारला अतिृष्टीमुळे हवालदील झालेल्या शेतकऱ्याला मदत देण्याची बुध्दी द्यावी अशी प्रार्थना विघ्हर्त्याकडे केली आहे. शिंदे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेईल आम्हाला आशा आहे. परंतु राज्यातील शेतकऱ्यांना वेळीच मदत मिळणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले. तसेच मागच्या तीन वर्षांपासून देशासह राज्यात कोरोनाचे संकट होत ते संकट थोडे कमी झाले आहे.
देशावरील आणि राज्यावरील कोरोनाचे संकट दूर होण्यासाठीही आम्ही बाप्पाकडे साकडे घातले आहे. राज्यात कोरोनाच्या संकटानंतर राज्य हिताची कामे होती अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. याचबरोबर त्यांना राज्यातील नेत्यांच्या नाराजी विषयी विचारले असता ते म्हणाले कि, वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांच्या भेटीगाठी होत असतात, याचा अर्थ असा नाही की नेते पक्ष सोडून जातील. नेते नाराज असतात, कोणत्या पक्षात नेते नाराज नाही, शिंदे गटात सुद्धा नेते नाराज आहेत. यामुळे हा नाराज झाला तो नाराज झाला. हा नेता त्यांच्या गाडीत बसला तो बसला याला काही महत्व देण्याची गरज नसल्याचेही ते म्हणाले.