Latest Marathi News

BREAKING NEWS

शेतकऱ्यांच्या अडीअडचणी समजावून घेण्यासाठी कृषीमंत्री आज पोहचणार शेतकऱ्यांच्या बांदावर

0

 

राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी या उपक्रमाला आजपासून सुरूवात होणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून कृषिमंत्री सत्तार हे एक दिवस शेकऱ्यांसोबत राहणार आहेत. शेतकऱ्यांना शेती करताना काय अडचणी येतात. शेतकरी आत्महत्या करण्याच्या मार्ग का निवडतो. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी या उपक्रमाची सुरुवात त्यांनी केली आहे.

सदर उपक्रमाची सुरुवात आजपासून विदर्भातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होत असलेल्या मेळघाटातून झाली आहे. अमरावती जिल्ह्यातील साद्राबाडी या गावातील शेतकरी शैलेंद्र सालकर यांच्याकडे ते रात्री मुक्कामी राहिले. अमरावती जिल्ह्यातील साद्राबाडी या गावातील शेतकऱ्यांनी तसेच गावकऱ्यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या या उपक्रमाचे स्वागत केले. त्यांच औक्षण देखील केले.

आज मेळघाटातील साद्राबाडी या गावातून ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ या उपक्रमाचा शुभारंभ करणार आहेत. आज दिवसभर सत्तार हे प्रत्यक्ष शेतात जाऊन शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहेत. शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी पदाधिकारी, अधिकारी हे संपूर्ण एक दिवस शेतकऱ्यांसोबत राहून संवाद साधणार आहेत. तसेच प्रत्येकांच्या अडचणी समजून घेणार आहेत.

सुलभ आणि प्रभावी कृषी विषयक धोरण तयार करण्यासाठी शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी आणि प्रश्न प्रशासनाने समजून घेणे, त्यावर कोणत्या उपाययोजना करून धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे. यासाठी प्रशासनातील अधिकारी, पदाधिकारी संपूर्ण एक दिवस शेतकऱ्यांसोबत व्यतीत करुन शेतकरी समस्यांचे मुळापर्यंत जाणार आहेत. त्यासाठीच राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ हा उपक्रम राज्यभर राबवण्याची संकल्पना मांडली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.