Latest Marathi News

BREAKING NEWS

शरद पवार यांनी डबल गेम केला, फडणवीसांच्या त्या विधानावर संजय राऊतांचा जोरदार टोला

0

मुंबई | भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीची युती होणार होती. आमचं सरकार स्थापन होणार होतं. त्यासाठी शरद पवार यांनीही पुढाकार घेतला होता. पण नंतर शरद पवार यांनी डबल गेम केला. त्यामुळे आम्हाला पहाटेचा शपथविधी घ्यावा लागला, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका प्रसिद्ध माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.

मात्र दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या या आरोपाची हवाच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काढून घेतली आहे. काय झालं, काय नाही हे महत्त्वाचं नाही. तुमचा प्रयोग फसला ही एका ओळीची गोष्ट आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यांना शरद पवार यांनी पूर्ण पाठिंबा दिला हेच सत्य आहे, असं रोखठोक प्रतिउत्तर संजय राऊत यांनी दिल आहे. ते आज माध्यमांशी आवड साधताना बोलत होते.

संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या पहाटेच्या शपथविधीच्या मुद्द्यावरून जोरदार टीका केली. फडणवीस यांच्याकडे कोणताही नवीन मुद्दा नाही. त्यांचं सरकार औटघटकेचं आहे. सुप्रीम कोर्टाने निर्णय घेण्यालसाठी दिलेल्या मुदतीचा अर्धा काळ गेला आहे. हे सरकार पडतंय. त्यामुळे फडणवीस झोपेत बडबडत असतील किंवा जागेपणी बडबडत असतील.

देवेंद्र फडणवीसांकडे फार लक्ष देऊ नका. शरद पवारांनी काही गोष्टी केल्या असतील तर ठिक आहे. त्यात नवीन काय? काय केलं पवार साहेबांनी? तुम्ही प्रयोग केला तुमचा प्रयोग फसला. ही एका ओळीची गोष्ट आहे. तुमचा प्रयोग तुमच्या अंगलट आला. लोकांनी तुमच्याकडे गांभीर्याने पाहिलं नाही, असा हल्लाच संजय राऊत यांनी थेट फडणवीस यांच्यावर चढवला.

Leave A Reply

Your email address will not be published.