मुंबई |
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयास राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तसेच मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली.

या भेटी दरम्यान ४२३३ लाभार्थ्यांना ३.७५ कोटी रकमेचा व्याज परतावा एका क्लिकव्दारे वितरित करण्यात आला असल्याची माहिती पाटील यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातुन दिली. या सोबतच महामंडळाच्या वतीने आजपर्यंत एकूण ६१,४११ लाभार्थ्यांना व्यवसायासाठी बँकेकडून ४३३७ कोटींचे कर्ज वितरण करण्यात आले व एकूण ४५७ कोटीचा व्याज परतावा देण्यात आल्याचे ही त्यांनी सांगितले.
यावेळी महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, व्यवस्थापकीय संचालक मंगेश मोहिते उपस्थित होते.