Latest Marathi News

BREAKING NEWS

“काँग्रेसमुळे शरद पवारांना पंतप्रधान होण्याची संधी मिळाली नाही”, नरेंद्र मोदींचं वक्तव्य

0

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गेल्या आठवड्यात पुण्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही उपस्थित होते. या समारंभात शरद पवारांनी हजेरी लावल्याने विरोधी पक्षांमध्ये राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. अशातच नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्याबद्दल मोठं विधान केलं आहे.

हेही वाचा >>जेष्ठ विचारवंत, लेखक प्रा. हरी नरके यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक व्यासंगी विचारवंत, साहित्यिक गमावला – चंद्रकांत पाटील

“काँग्रेसमुळे शरद पवारांना पंतप्रधान होण्याची संधी मिळाली नाही,” असं वक्तव्य नरेंद्र मोदी यांनी केल्याचं सूत्रांनी ‘इंडिया टुडे’ला सांगितलं. मोदींनी महाराष्ट्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) खासदारांशी मोदींनी संवाद साधला. त्यानंतर मोदींनी हे विधान केले.

हेही वाचा >>“पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये जाऊ शकत नाही, कारण तुम्ही तिथे…!”, राहुल गांधींची केंद्र सरकारवर टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “काँग्रेसमधील घराणेशाहीच्या राजकारणामुळे शरद पवारांना पंतप्रधान होण्याची संधी मिळाली नाही. तसेच, शरद पवार आणि काँग्रेसने अनेक राजकीय क्षमता असलेल्या नेत्यांना डालवण्यांचं काम केलं.”

Leave A Reply

Your email address will not be published.