Latest Marathi News

BREAKING NEWS

शाहरुख, सलमानला मागे टाकत ‘हा’ अभिनेता चित्रपटासाठी घेणार तब्बल २०० कोटी मानधन

0

चित्रपट सृष्टीत जास्त मानधन घेणारा अभिनेता कोण ? अशी नेहमीच चर्चा सुरु असते. याच मुद्द्यावरून निर्माण होणाऱ्या या प्रश्नाच्या उत्तरात कधी अक्षय कुमार, कधी सलमान खान तर कधी शाहरुख खानचे नाव पुढे येत आहे. पण या सर्व प्रश्नावर आता दाक्षिणात्य अभिनेत्याने बॉलिवूडच्या अभिनेत्यांवर मात केली आहे. तो केवळ साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्येच नव्हे तर संपूर्ण भारतात सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता बनला आहे.

रिपोर्ट्सनुसार, थलापति विजय आता भारतातील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता बनला आहे. दोन वर्षांपूर्वीपर्यंत विजय त्याच्या चित्रपटांसाठी १०० कोटी रुपये घेत होता. पण आता त्याने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केल्याने त्याची फी दुप्पट वाढली आहे. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.
आता तो त्याच्या पुढच्या ‘थलापति ६८’ या चित्रपटासाठी २०० कोटी रुपयांची तगडी फी घेत आहे.

थलापति विजयच्या आधी देशातील कोणत्याही अभिनेत्याने एका चित्रपटासाठी २०० कोटी रुपये फी घेतलेली नाही. थलापति विजय ज्या चित्रपटासाठी 200 कोटी रुपये मानधन घेत आहे त्याचे तात्पुरते नाव ‘थलापति ६८’ ठेवण्यात आले आहे. विजयच्या कारकिर्दीतील हा ६८ वा चित्रपट आहे. असं म्हटलं जात आहे की, हा थलापतिचा शेवटचा चित्रपट देखील ठरू शकतो. कारण या चित्रपटानंतर तो राजकारणात पाऊल ठेवण्याचा विचार करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.