Latest Marathi News

BREAKING NEWS

ठाकरे गटाचा बडा नेता आज शिंदे गटात प्रवेश करणार?

0

ठाणे | राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून उद्धव ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांनी थेट शिंदे गट जाहीर प्रवेश केला होता आता पुन्हा एकदा शिंदे गट ठाकरे गटाला जोरदार धक्का देण्याच्या तयारीत आहे. या संदर्भातील माहिती शिवसेना प्रवक्ते आणि ठाणे मनपा माजी महापौर नरेश मस्के यांनी ट्विट करून दिली आहे.

आज ‘उबाठा’चा आणखी एक मोहरा कमी होणार आहे. शिवसेना शिंदे गटात प्रवेश करून तो खऱ्या विचारांशी निष्ठा राखणार आहे. खरा कार्यकर्ता हा कधीही ठाकरे गटासोबत राहू शकत नाही, अशा अशायाची एक कविता नरेश मस्के यांनी ट्विट केली आहे. नरेश मस्के यांनी काय म्हटलं? नरेश मस्के यांच्या या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

आता ठाकरे गटातून शिंदे गटात नेमका कोणता नेता प्रवेश करणार आहे? याची चर्चा सुरू झाली आहे. नरेश मस्के यांनी ट्विटच्या माध्यमातून ठाकरे गटाला जोरदार टोला लगावला आहे. खरा कार्यकर्ता हा कधीही ठाकरे गटासोबत राहू शकत नाही. आज ‘उबाठा’चा आणखी एक मोहरा कमी होणार आहे. शिवसेना शिंदे गटात प्रवेश करून तो खऱ्या विचारांशी निष्ठा राखणार आहे, अशा अशायाच ट्विट नरेश मस्के यांनी केलं आहे. आता मस्के यांच्या या तितची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.