Latest Marathi News

BREAKING NEWS

भ्रष्टाचार प्रकरणी ईडीकडून वरिष्ठ IRS अधिकारी सचिन सावंत यांना अटक

0

मुंबई |

ज्येष्ठ आयआरएस अधिकारी आणि ईडीचे माजी कर्मचारी सचिन सावंत यांच्या घरावर ईडीनं छापेमारी केली आहे. छापेमारीनंतर ईडीकडून सचिन सावंत यांना अटकही करण्यात आली आहे.

सीमाशुल्क आणि अप्रत्यक्ष कर विभागात कार्यरत असलेल्या सचिन सावंत यांच्या मुंबईतील निवासस्थानावर ईडीकडून मंगळवारी छापा टाकण्यात आला. भ्रष्टाचार आणि बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी ही कारवाई करण्यात आली. काल मध्यरात्रीपर्यंत सावंत यांच्या घरी ईडीचा तपास सुरू होता. 500 कोटी रुपये बेकायदेशीररित्या वळवल्याच्या एका प्रकरणातील आरोपीनं सावंत यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यावरून सीबीआयनं एफआयआर दाखल केली आणि याच प्रकरणी काल ईडीनं छापेमारी केली होती

मंगळवारी ईडीनं वरिष्ठ आयआरएस अधिकारी सचिन सावंत यांच्या घरावर धाड टाकली होती. सीमाशुल्क आणि अप्रत्यक्ष कर विभागात कार्यरत असलेल्या सचिन सावंत यांच्या मुंबईतील निवासस्थानावर ही छापेमारी करण्यात आली होती. भ्रष्टाचार आणि बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी ईडीकडून छापेमारी करण्यात आली होती. यासोबतच याचप्रकरणी ईडीनं सचिन सावंत यांच्या नातेवाईकांच्या घराचीही झाडाझडती घेतली.

Leave A Reply

Your email address will not be published.