Latest Marathi News

BREAKING NEWS

आठवलेंच्या ‘त्या’ ऑफरबद्दल भुजबळांनी मानले आभार, म्हणाले

0

आरपीआयचे प्रमुख आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना आपल्या पक्षात येण्याची ऑफर दिली होती. आठवले यांच्या या ऑफरवर प्रतिक्रिया देताना भुजबळ यांनी उपरोधिक टोला लगावला आहे. आठवले यांनी मला निमंत्रण दिलं, त्यासाठी मी आठवलेंचे आभार मानतो. मी त्यांना लवकरच भेटणार आहे. मला रिपाईमध्ये कोणतं पद भेटणार यावर मी त्यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचं म्हणत जोरदार टोला लगावला आहे. तसेच राष्ट्रवादीच्या बैठकीवर प्रतिक्रिया यावेळी बोलताना भुजबळ यांनी प्रदेशाध्यक्षपदावर देखील प्रतिक्रिया दिली आहे.

राष्ट्रवादीची बैठक दिल्लीमध्ये होणार आहे. मात्र या बैठकीत प्रदेशाध्यक्ष पदाबाबत चर्चा होईल की नाही मला माहित नाही. मला त्याची काहीही कल्पना नाही. मी राष्ट्रीय कार्यकारिणीवर नाही.मला त्या कार्यकारिणी बैठकीचं आमंत्रणही नाही. पाटण्यात सर्व विरोधकांची जी बैठक झाली त्यावर या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.

पुणे हल्ल्यावर प्रतिक्रिया दरम्यान काल पुण्यामध्ये एका तरुणीवर एकतर्फी प्रेमातून तरुणानं कोयत्यानं वार केला. यावर देखील छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली.
हे काय चाललंय? महात्मा फुले यांनी सगळ्यांच्या शिक्षणासाठी काम केलं. अशा या पुण्यभूमीत काय चालू आहे. पोलीस आयुक्तांनी या प्रकरणात कडक कारवाई करावी, अशा आरोपींना मोक्का लावला पाहिजे अशी मागणी भुजबळ यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.