Latest Marathi News

BREAKING NEWS

सावरकर देशाला कलंक होते, काँग्रेसच्या माजी आमदाराचे वादग्रस्त विधान

0

स्वा. विनायक दामोदर सावरकर यांच्यावर टिक केल्यामुळे टीकेचे धनी बनलेले राहुल गांधी यांच्या पक्षाच्या आजी आमदाराने पुन्हा एकदा अमरावती जिल्ह्यातील धामणगाव मतदार संघाचे काँग्रेसचे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी खळबळजणक वक्तव्य केले आहे. यावरून राज्यातील राजकारण चांगलच तापलं होते. दरम्यान या प्रकरण ताजे असतानाच काँग्रेसचे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे.

राहुल गांधीच्या सावरकरांवरील वक्तव्यानंतर, राज्यात आरोप प्रत्यारोपाने राजकारण पेटल आहे. राज ठाकरे यांच्या गोरेगाव येथील सभेनंतर काँग्रेसचे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी सावरकर देशाला कलंक होते अस खळबळजनक विधान अमरावतीत केले आहे. दरम्यान त्यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्याला समर्थन देखील केले आहे.

इतकचं काय तर जगताप यांनी सेवानिवृत्त न्यायाधीश बी जी कोळसे पाटलांची क्लिप बघा. त्यांनी त्यात सविस्तर सांगितलं आहे. सावरकर खरे असतील तर कोळसे पाटील यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करा असे आव्हान दिले आहे. नीच राजकारण करणाऱ्या सावरकरांना आम्ही कधीही स्वातंत्र्यवीर म्हणणार नाही असे वक्तव्य वीरेंद्र जगताप यांनी केले

Leave A Reply

Your email address will not be published.