मुंबई प्रतिनिधी |खिशात मोबाईल फुटून पायाला गंभीर दुखापत झालेल्या अमरावती येथील रहिवाशी अंकित भुतेला अखेर महाराष्ट्र नवनिर्माण टेलिकॉम सेनेच्या दणक्यानंतर विवो कंपनीकडून न्याय मिळाला आहे तसेच लवकरच मोबाईल फुटल्यामुळे त्यांच्या पायाला झालेली दुखापत त्यावर रुग्णालयात खर्च करण्यात आलेली रक्कम तसेच नवा मोबाईल देण्याचे आश्वासन कंपनीने टेलिकॉम सेनेला दिले आहे.
काही दिवसांपूर्वी संपूर्ण माध्यमांवर अंकित भुते यांच्या मोबाईल फुटीची बातमी दाखवण्यात आली होती मात्र मदतीसाठी कोणीही पुढे आले नाही मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून अंकितचा विषयी महाराष्ट्र नवनिर्माण टेलिकॉम सेनेकडे आल्यानंतर अध्यक्ष सतीश नारकर यांनी या विषयी विवोच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांशी स्वतः चर्चा करून मुंबई स्थित अंधेरी येथील कार्यालयात मदत मिळणेसंदर्भात पत्रव्यवहार केला होता तसेच या प्रकरणात एमएनटीसचे सरचिटणीस निर्मल निगडे हे स्वतः विवोच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात होते.
महाराष्ट्र नवनिर्माण टेलिकॉम सेनेने या विषयी लक्ष घातल्यानंतर कंपनीच्या वरिष्ठांनी या प्रकरणात संपूर्ण सहकार्य करण्याचे मान्य केले होते तसेच लवकरात लवकर कारवाई करून अंकित भुतेच्या वैद्यकीय उपचारासाठी झालेला खर्च देण्याचे विवोच्या अधिकाऱ्यांनी मान्य केले आहे या बाबत अंकितने पत्र लिहून अध्यक्ष सतीश नारकर तसेच संपूर्ण टेलिकॉम सेनेच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.