Latest Marathi News

BREAKING NEWS

निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे सुपारी घेऊन……. खासदार विनायक राऊतांनी लगावला टोला

0

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सुपारी घेऊन काम करतात, असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. राज ठाकरे यांनी मुंबईतील गट प्रमुखांच्या मेळाव्यात मनसेने आतापर्यंत केलेल्या आंदोलनावर भाष्य केलं. तसंच उद्धव ठाकरे यांच्यासह विरोधकांवरही टीकेचे बाण सोडले. यावर खासदार विनायक राऊत यांनी टीका केली आहे आता या टिकेवरून शिवसेना आणि मनसेत पुन्हा एकदा वाद होण्याचे चिन्ह दिसून येत आहे,

“मनसेने फक्त स्वप्न पहावी, अस्तित्व नाही. निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे सुपारी घेऊन काम करतात,” असं राऊत म्हणाले. ते रत्नागिरीतील पत्रकार परिषदेत बोलत होते. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी तयारीला लागा. मी तुमच्या हाती महापालिकेची सत्ता आणून देतो, असं राज ठाकरे गटप्रमुखांच्या मेळाव्याला संबोधित करताना म्हणाले होते. यावरूनच विनायक राऊतांनी टोला लगावला होता.

विनायक राऊत म्हणाले की, “त्यांनी फक्त स्वप्न पाहावीत. निवडणूक आली की अस्तित्त्व दाखवण्यासाठी असे मेळावे घ्यायचे. निवडणुकीच्या वेळी कोणाची ना कोणाची सुपारी वाजवायची हा धंदा मागील अनेक वर्षांपासून राज ठाकरे यांनी चालू केलेला आहे.” विनायक राऊत पुढे म्हणाले की, “राज ठाकरे फक्त नक्कल करुन राजकारण करत आहेत. बाळासाहेबांचं नाव घेऊन उद्धव ठाकरे यांची नक्कल करायची. पायाला ठेच लागली तरी तुम्ही मुंबईला अॅडमिट होता. उद्धव ठाकरे यांचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर होतंय ही राज ठाकरे यांची पोटदुखी आहे.”

Leave A Reply

Your email address will not be published.