Latest Marathi News

BREAKING NEWS

साताऱ्यात महापुरुषांचा अवमान; संतप्त जमावाने तरुणाचे घर पेटवले

0

सातारा । समाजमाध्यमांवर महापुरुषांची बदनामीकारक मजकूर प्रसारीत झाल्याच्या घटनांमुळे वाद झाल्याचे चिंता महाराष्ट्रात मागच्या काही दिवसांपूर्वी दिसून आले होते अशातच अशीच घटना रविवारी रात्री खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथे घडाळ्यामुळे यांचे तीव्र पडसाद उमटले. एका गटाने विशिष्ठ समुदायास लक्ष्य करत जाळपोळ, दगडफेक करत प्रार्थना स्थळावर हल्ला केला.

सदर एक युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात तणाव असून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी सर्वांना शांततेचे आवाहन केले असून खबरदारी म्हणून सर्व इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. असाच काहीसा प्रकार काही दिवसापूर्वी कोल्हापुरात सुद्धा असाच प्रकार घडला होता त्यापाठोपाठ साताऱ्यात घडल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात अशा घटना घडत असल्याचे प्रमाण वाढत आहे.

याच पार्श्वभूमीवर सदर जमावाने त्याच परिसरातील एका प्रार्थनास्थळाच्या दिशेने चाल केली. यावेळी त्या प्रार्थनास्थळामध्ये सात ते आठ जण प्रार्थनेसाठी जमले होते. आक्रमक जमावाने प्रार्थनास्थळात घुसून आतमधील युवकांना मारहाण केली. या मारहाणीत युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सूरू आहेत. सध्या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहे..

महाराष्ट्राचा मणिपूर करायचा नसेल तर मराठ्यांना आरक्षण द्या !

Leave A Reply

Your email address will not be published.