छगन भुजबळ यांनी सरस्वती संदर्भात केलेल्या वक्तव्याबद्दल नवा वाद निर्माण झाला असून भाजपासह सर्वच विरोधकांनी भुजबळांवर जोरदार टीका केली होती यावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरस्वतीचे फोटो काढले जाणार नाही, कोणाला काय वाटेल ते करणार नाही. जे लोकांना वाटते, तेच आम्ही करणार अशी खरमरीत प्रतिक्रया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. कालच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील भुजबळांच्या वक्तव्यावर सडकून टीका केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिकमध्ये एका धार्मिक कार्यक्रमानिमित्त आले असता त्यांनी याबाबत आपले मत व्यक्त केले. दोन दिवसांपूर्वी मुंबई येथील एका कार्यक्रमात राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी सरस्वतीच्या फोटो संदर्भात वक्तव्य केले होते. यानंतर राज्यातील अनेक नेत्यांनी या वक्तव्यांवर टीका करत भुजबळांचे कांन टोचले.
महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाला दीडशे वर्षे पूर्ण होत आहे. या कार्यक्रमप्रसंगी भुजबळ यांनी वरील वक्तव्य केले होते. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर देताना म्हणाले कि, सरस्वतीचे फोटो काढले जाणार नाही, कोणाला काय वाटेल ते करणार नाही असेही ते म्हणाले.
काय आहे प्रकरण ?
दोन दिवसांपूर्वी मुंबई येथील महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाला दीडशे वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात भुजबळ म्हणाले होते कि, ‘अंधश्रद्धा आणि आमच्या महिला-भगिनींबाबत काही विचारायला नको किंवा काही सांगायला नको. शाळांमध्ये सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, बाबासाहेबांचा फोटो लावा, कर्मवीर भाऊराव पाटील यांचा फोटो लावा. पण, सरस्वतीचा, शारदा मातेचा फोटो लावला जातो? असा प्रश्न भुजबळ यांनी केला.