Latest Marathi News

BREAKING NEWS

आजपर्यंत झाला नाही असा मेळावा भरवा, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना

0

 

शिवसेनेत कनाथशिंदे त्यांच्या बंडखोरीनंतर उभी फूट पडल्यानंतर होणाऱ्या दसरा मेळाव्याबाबत उत्सुकता आहे.शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाकडून दसरा मेळाव्याची जोरदार तयारी सुरु आहे. ठाकरे गटाकडून शिवतीर्थावर ऐतिहासिक दसरा मेळावा भरवण्याची तयारी सुरु झाली आहे. ठाकरे गटाकडून पक्षातील पदाधिकारी, शाखाप्रमुख, जिल्हाप्रमुख यांच्यावर विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. आजपर्यंत झाला नाही असा दसरा मेळावा भरवण्याकरता पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

यंदा दशहरा मेळावा भव्य होणार असून शिवाजी पार्कवर होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी दीड लाखांपर्यंत शिवसैनिकांची गर्दी जमण्याची योजना आखण्यात आली आहे. विविध जिल्ह्यांमधून शिवसैनिक शिवतीर्थावर पोहोचवण्याची जबाबदारी जिल्हाप्रमुखांवर सोपवण्यात आली आहे. तर शिवसैनिकांच्या स्वागताची जबाबदारी मुंबईतील शिवसेनेच्या शाखाप्रमुखांना देण्यात आली आहे.

दादर, माहिम, प्रभादेवी परिसरात शिवसैनिकांच्या स्वागतासाठी विशेष गेट उभारण्यात येणार आहे. राम गणेश गडकरी चौक, राजा बढे चौक, सावरकर मार्ग, – सिद्धीविनायक मार्ग इथे गेट उभारले जाणार आहेत. तर उद्धव ठाकरे यांचं भाषण ऐकण्यासाठी स्क्रीन दादर आणि आजूबाजूच्या परिसरात लागणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.