Latest Marathi News

BREAKING NEWS

सरकारला कुठलाही धोका नाही, कारण सर्वांचा बाप सिल्वर ओकवर : देवेंद्र भुयार

0

 

शिवसेनेने विधान परिषदेला आपल्या अपक्ष आमदारांची मते काँग्रेसकडे वळविली होती. असे असले तरी काँग्रेसचा उमेदवार पडला होता. यामुळे काँग्रेस आमदारांत नाराजी असल्याचे वारे सुरु असताना अचानक शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदेंनीच बंड पुकारल्याने मोठी खळबळ उडाली आहे. यावर आता अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी भाष्य केले आहे.

एकनाथ शिंदे हे आनंद दिघे यांचे शिष्य आहेत. गद्दारी त्यांच्या रक्तात नाही. ते काही चुकीचा निर्णय घेतील असं वाटत नाही असं वक्तव्य अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी केलं आहे. एकनाथ शिंदे हे अतिशय प्रामाणिक, सर्वाधिक काम करणारे मंत्री आहेत. ते काही काही चुकीचं करतील अस वाटत नसल्याचं भुयार यांनी सांगितलं. सरकारला कुठलाही धोका नाही, कारण या सर्वांचा बाप सिल्वर ओकवर बसलेला आहे असे म्हणत भुयार यांनी सरकारला धोका असल्याच्या चर्चा फेटाळून लावल्या.

भाजपचे सर्वच नेते एकमेकांच्या संपर्कात राहतात. याचा अर्थ असा नाही की, शिंदे काही चुकीचा निर्णय घेतील. संजय राऊत यांनी राज्यसभा निवडणुकीत उघडपणे आमचे नाव घेतले. आता त्यांच्याच पक्षातील तीन आमदारांनी मतं दिली नाहीत, आता राऊत काय निर्णय घेतात ते पाहू असे देखील भुयार यावेळी म्हणाले. माझ्या मनातील मुख्यमंत्री अजित पवार आहेत. ते मुख्यमंत्री झाले तर तो सर्वात आनंदाचा क्षण असेल असेही भुयार म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.