मुंबई | विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर शिवसेनेतील संकट वाढलं आहे. शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे नाराज असून ते समर्थक आमदारांसह सूरतमध्ये आहेत. शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेना संकटात आहे. शिवसेनापाठोपाठ काँग्रेसमध्येही भूकंप होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे सध्या आमदारांसह सूरतमधील हॉटेलमध्ये थांबलेले आहेत.
अशात आता भाजपने एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली असल्याची बातमी समोर येत आहे. तर दुसरीकडे शिवसेनापाठोपाठ काँग्रेसमध्ये भूकंप, बाळासाहेब थोरात राजीनामा देण्याच्या तयारीत समोर आलेल्या माहितीनुसार, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातही शिवसेनेला खिंडार पडण्याची शक्यता आहे.
तिन्ही जिल्ह्यातील बहुतांश आमदार, खासदार एकनाथ शिंदेंसोबत असल्याचं समोर येत आहे. त्यामुळे शिवसेनेच्या बालेकिल्ल्यांना खिंडार पडण्याची शक्यता आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या ठाण्याला खिंडार पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे आमदार, खासदार एकनाथ शिंदेंसोबत – ठाण्यातून स्वतः एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक, कल्याण पश्चिमचे विश्वनाथ भोईर, अंबरनाथमधील बालाजी किणीकर, भिवंडी ग्रामीण येथील शांताराम मोरे, पालघर येथील अमित वनगा रायगड महाडमधील भरत गोगावले, कर्जतमधील महेंद्र थोरवे, अलिबागमधील महेंद्र थोरवे सोबत आहे.