Latest Marathi News

BREAKING NEWS

संसदेच्या आवारात कंगनाला करायचे आहे ‘इमर्जन्सी’ सिनेमाचे शूटिंग

0

अभिनेत्री कंगना राणावतचा आगामी चित्रपट ‘इमर्जन्सी’ सध्या चांगलाच चर्चेत आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाला अजून वेळ आहे, मात्र त्याआधी चित्रपटाचा टीझर आणि महत्वाच्या कलाकारांचा लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटातील अभिनेत्री कंगना राणावत आणि अभिनेते अनुपम खेर, श्रेयश तळपदे यांचा फर्स्ट लूक समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नुकतंच अभिनेत्री कंगनाने संसदेच्या आवारात तिच्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी लोकसभा सचिवालयाकडे परवानगी मागितली आहे. यासंदर्भात कंगनाने पत्रदेखील लिहिलं आहे आणि त्यावर विचार सुरू आहे, परंतु तिला परवानगी मिळण्याची शक्यता फारच कमी आहे असं स्पष्ट केलं जात आहे. मीडिया रिपोर्ट आणि काही खाजगी वृत्तसंस्थेने याबद्दल माहिती दिली आहे.

दरम्यान, संसदेच्या आवारात शूटिंग किंवा व्हिडिओग्राफी करण्याची परवानगी नसते. हे शूटिंग कोणत्या अधिकृत सरकारी कामासाठी केले जात असेल तर ती वेगळी बाब आहे. प्रामुख्याने दूरदर्शन आणि संसद टीव्ही यांनाच संसदेच्या आवारात चित्रीकरणाची करण्याची परवानगी आहे. त्यामुळे आता कंगना राणावतला चित्रपटाच्या शूटिंगसाठी परवानगी मिळणार का? हे पाहणे महत्वाचे आहे. शिवाय या परिसरात चित्रीकरणाची तिला परवानगी मिळाली तर याचे राजकीय पडसादसुद्धा उमटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अटल बिहारी वाजपेयींच्या भूमिकेत श्रेयस तळपदेची भूमिका लोकांना पसंत पडत आहे. चाहते उत्कृष्ट, काय निवड, सर्वोत्तम निवड अशा कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिले,’व्वा, आणीबाणीसाठी सर्व महान कलाकार एकत्र आले.’ तर दुसर्‍याने लिहिले आहे,’आशा आहे की श्रेयस तळपदे अटल बिहारी वाजपेयींच्या भूमिकेत धमाल करेल.

Leave A Reply

Your email address will not be published.