Latest Marathi News

BREAKING NEWS

शिक्षणशास्त्र महाविद्यालयात अल्पसंख्यांक दिन साजरा

0

बार्शी |

पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर संलग्नित श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालय बार्शी. अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 18 डिसेंबर अल्पसंख्यांक दिन साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.डॉ. संजय करंडे सर व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय प्राचार्य डॉक्टर एस एस गोरे व बीएड विभाग प्रमुख प्रा.डॉ. एस.डी भिलेगावकर तसेच प्रा. डॉ. पी ए पाटील , डॉ.एम व्ही मते, आकाश कूल मार्गदर्शक प्रा.डॉ. आर. ए. फुरडे उपस्थित होते.

अल्पसंख्यांक दिनाच्या निमित्ताने निबंध व भित्तिपत्रक स्पर्धेचे आयोजन केलं होतं त्यामध्ये प्रथम व द्वितीय नंबर काढण्यात आले. निबंध मध्ये प्रथम प्रगती कळसुले , द्वितीय शेळके देवयानी तर भित्तिपत्रकामध्ये प्रथम विद्या ठोंबरे व द्वितीय शेख मुशिरा या प्रशिक्षणार्थींना कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉ. संजय करंडे व प्राचार्य डॉ.एस एस गोरे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रमुख लाभलेले संजय करंडे यांचा सत्कार करण्यात आला तसेच युनिव्हर्सिटी मध्ये गोल्ड मेडल मिळवलेले प्रशिक्षणार्थी कुमारी मानसी निंबाळकर (बीएड), शितल लोंढे (एम एड) यांचा सत्कार महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. एस एस गोरे यांच्या हस्ते करण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे व महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. बीएड प्रशिक्षणार्थी प्रतीक शिंदे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. सागर कापसे व प्रगती कळसुले यांनीही
यांनी अल्पसंख्याक दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राध्यापक डॉ. संजय करडे यांनी मार्गदर्शन केले. प्रा.डॉ. एस एस गोरे यांनी अध्यक्षीय समारोप केला. उपस्थितांचे आभार नलवडे अपर्णा यांनी मानले. क्रमाचे सूत्रसंचालन पाटील ज्ञानेश्वरी व पाटील मंजुषा यांनी केले. या कार्यक्रमाला बी एड प्रथम वर्ष व द्वितीय वर्षातील प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.