Latest Marathi News

BREAKING NEWS

बोरामनी विमानतळ सुरु करावे सिद्धेश्वर साखर कारखाना सभासद कामगारांच्या या मागणीस पाठींबा देण्यासाठी सोलापुर शहर काँग्रेस कमिटी पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक संपन्न

0

सोलापूर |

बोरामनी आंतरराष्ट्रीय विमानतळ लवकरात लवकर सुरु करावे. सिद्धेश्वर सहकारी साखर खारखान्याला कोणताही धक्का न लावता होटगी रोड विमान तळावरुन तूर्त एका बाजुने विमानसेवा सुरु करावी. सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे सभासद आणि कामगारांच्या या मागणीस सोलापुर शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहिर पाठिंबा देण्यात येणार आहे. या संदर्भात आज रोजी काँग्रेस भवन सोलापुर येथे अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.

यावेळी जेष्ठ नेते N. K. क्षीरसागर, अशोक कलशेट्टी यांनी माहिती दिली. यावेळी अध्यक्ष चेतन नरोटे यांनी या मागणीस काँग्रेस पक्षाचा पाठिंबा असून या मोर्चात काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सहभागी होण्यासाठी दिनांक १९ डिसेम्बर २०२२ रोजी सकाळी १०:३० वाजता सात रस्ता शासकीय विश्रामगृह येथे उपस्थित रहावे. यावेळी मा नगरसेवक विनोद भोसले यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.