Latest Marathi News

BREAKING NEWS

संजय राऊत म्हणाले, आंबेडकरांचा जन्म महाराष्ट्रात झाला; भाजप नेते म्हणाले की,

0

महारापुरुषांबाबत अवमानाचा मुद्दा तापला आहे. भाजपच्या अनेक नेत्यांनी शिवाजी महाराजांपासून ते महात्मा ज्योतिबा फुले अशा अनेक महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलंय. यावरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरकार आणि भाजपविरोधात रान उठवलं आहे. मात्र, अशात आता खुद्द उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे.

मात्र राऊतांनी केलेल्या या विधानावरून सत्ताधाऱ्यांनी राऊतांविरोधात रान उठवले आहे. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्य प्रदेशातल्या महू या गावात झाला. असे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. तर हे असे आहे सर्वज्ञानी यांचे अगाध ज्ञान, असे म्हणत चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली. तर भाजप आमदार नितेश राणे यांनीही टीकास्त्र सोडले आहे.

मीडियासोबत बोलताना संजय राऊत म्हणाले, विरोधी पक्षाचा आणि जनतेचा आवाज दाबण्याचा हा प्रकार आहे. असं घडू नये. पण, महाराष्ट्रामध्ये हे घडत आहे. या महाराष्ट्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला. बाबासाहेबांनी लोकशाही जन्माला घातली. त्या महाराष्ट्रात हे घडतंय, हे महाराष्ट्राचे दुर्दैव असल्याचे संजय राऊत म्हणाले. ही चूक लक्षात येताच भाजपच्या महिला प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली.

चित्रा वाघ म्हणाल्या, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महाराष्ट्रात नाही. मध्य प्रदेशातील महू येथे झाला. इतक सामान्य ज्ञान असू नये. आमचे आदर्श असणारे बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल चुकीची माहिती देऊन तुम्ही काय मिळवताय, असा सवालही चित्रा वाघ यांनी विचारला. रोज सकाळी महाराष्ट्राला ज्ञान देणारे सर्वज्ञानी इतके अज्ञानी असतील, याचे दर्शन आज महाराष्ट्राला झाले, असेही चित्रा वाघ म्हणाल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.