मुंबई | उद्धव हाकारे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदे, फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. शिंदे, फडणवीस सरकारकडून अद्यापही महाविकास आघाडीच्या मोर्चाला परवानगी देण्यात आलेली नाही. यावरून संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच नाशिकमध्ये शिंदे गटाने ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. ठाकरे गटाच्या 12 माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. यावरही संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नाशिकमध्ये शिंदे गटाने ठाकरे गटाला मोठा धक्का दिला. नाशिकमधील ठाकरे गटाच्या बारा माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये या माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला. याबाबत संजय राऊत यांना विचारले असता त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
शिंदे गटात जाणारे ते माजी नगरसेवक दलाल असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला फटका मुंबईसह राज्यातील महत्त्वाच्या शहरातील महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. यामध्ये नाशिक महापालिकेचा देखील समावेश आहे. ठाकरे गटाने मुंबईसह नाशिक महापालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांचा नाशिक दौरा पार पडला होता. मात्र त्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्येच नाशिकच्या बारा माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.