Latest Marathi News

BREAKING NEWS

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकदिवसीय रत्नागिरी दौऱ्यावर; उद्धव ठाकरे गट राहणार का उपस्थित ?

0

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एक दिवसाच्या रत्नागिरी दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी त्यांच्या स्वागताची जोरदारी तयारी करण्यात आली आहे. मुख्य म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून रत्नागिरी जिल्ह्याची ओळख आहे. दरम्यान,राज्यात झालेल्या सत्तातरानंतर आणि शिवसेनेतील मोठ्या राजकीय बंडानंतर, फुटीनंतर होत असलेला दौरा महत्त्वाचा आहे. सकाळी दहा वाजता मुख्यमंत्री मुंबईहून शासकीय हेलिकॉप्टरने रत्नागिरीला रवाना होती आणि सकाळी अकरा वाजेपर्यंत रत्नागिरी विमानतळावर पोहोचतील.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागताची जोरदार तयारी करण्यात आली असून दिवसभर त्यांचा भरगच्च असा कार्यक्रम देखील आहे. आपल्या दौऱ्याची सुरुवात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार आहेत. यावेळी त्यांना रिफायनरी प्रकल्प समर्थक आणि विरोध असे दोन्ही बाजूंचे नेते भेटण्याची सहायता वर्तवली जात आहे.

दरम्यान रत्नागिरीत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमाला ठाकरे गटाचे नेते हजर राहणार नाहीत. कार्यक्रमांच्या निमंत्रण पत्रिकेत ठाकरे गटातील खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी, आमदार भास्कर जाधव यांची नावं आहे. त्यामुळे फुटीनंतर शिंदे गट आणि ठाकरे गटाचे नेते एकाच मंत्रावर येणार का याची उत्सुकता लागली होती. मात्र प्रोटोकॉल म्हणून आमचं नाव टाकलं असेल किंवा आम्हाला निमंत्रित केलं असेल, पण त्यांचा तो पक्षाचा कार्यक्रम असल्यामुळे आम्ही उपस्थित राहणार नाही असं आमदार राजन साळवी यांनी म्हटलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.